Sawach Bharat

नमस्कार,प्रथमतः ही लेखन संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. रजनीकांत शहा सरांचे मनःपूर्वक आभार.
वरील विषय खरे पहाता मूलभूत आहे. आपल्या विद्यमान पंतप्रधानांनमुळे आत्ता आपण यावर बोलत आहोत. हेही नसे थोडके.
आपल्या परंपरेचा विचार करता आणि दैनंदिन आचारा चा विचार करता असे लक्षात येते की पाश्चात्य विचारांच्या मागे लागून आपण आपल्याच पायांवर कुर्हाड मारून घेतली आणि अस्वच्छतेला आमंत्रण दिले.
आपली प्राचीन परंपरा अमलात आणल्यास त्याला वैज्ञानिक विचारांची असलेली बैठक जर नविन पिढीला त्यांच्या भाषेत उलगडून दाखवली तर बाह्य स्वच्छते बरोबरच होणारी अंतर्गत स्वच्छता,परिणामी रोगमुक्त आणि मानसिकदृष्ट्या सक्षम ,नैतिकता जपणारा समाज परत एकदा वास्तवात येऊन आपला देश जगात सन्मानाने वावरू शकतो.
धन्यवाद!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *