invention of safty band- to avoid road accidents

वाहनचालकाने मद्यपान केल्यामुळे वाहनाचा अपघात किंवा वाहनचालकाच्या डोळ्यावर झापड आल्यामुळे बसचा अपघात १० जण मृत्यूमुखी, २० जखमी या आणि अशा अपघाताच्या अनेक बातम्या आपण आजकाल ऐकतो. पण आता या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी एक उपाय शोधून काढला आहे. तो आहे ‘इंस्टंट अॅंटी ड्रायव्हिंग सेफ्टी बॅंड’. ह्या उपकरणाचा शोध लावला आहे उत्तराखंड येथील डेहराडून येथे राहणार्‍या अभिलाष सेमवालने.

२४ वर्षाच्या अभिलाषने याआधी मोबाइल बॉम्ब डिटेक्टर तयार केला होता. ज्यामुळे हे उपकरण असलेल्या १ किलोमीटरच्या परिसरात बॉम्ब असेल तर स्फोटकाच्या गंधाच्या मदतीने हे उपकरण त्याचा शोध घेतो. यासाठी उत्तराखंड आणि नायझेरियाच्या सरकारने अभिलाषला सहाय्य केले होते.

आता अॅंटी ड्रायविंग बॅंड हा त्याचा पुढचा आविष्कार आहे. हा बॅंड हातात बांधल्यावर गाडी चालवताना जर ड्रायवरला डुलकी आली तर त्याला शॉक बसतो आणि तो भानावर येतो.  हा शॉक कमी तीव्रतेचा असतो. म्हणजे ड्रायवरची फक्त झोप उडते त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटत नाही. या उपकरणामध्ये बॅंड, ब्लूटूथ डिव्हाईस आणि मोबाइल सॉफ्टवेअर आहे. बॅंडमध्ये बॉडी सेन्सर बसवण्यात आला आहे. तो ड्रायवरची स्लीपिंग पल्स रीड करेल. ड्रायवरला डुलकी लागल्यास ही यंत्रणा सक्रिय होईल. आणि जर जास्त शॉक बसला तर ड्रायवरने अधिक प्रमाणात दारूचे सेवन केले होते असा निष्कर्ष काढता येतो. कारण तशी सुविधाही त्या बॅंडमध्ये आहे.

तसेच या ब्लूटुथ डिवाइसमध्ये क्लाऊड कम्प्यूटिंग सिस्टम आहे. जे सॅटलाइटच्या माध्यमातून ड्रायवरला मोबाइल सॉफ्टवेअरवर संपूर्ण माहिती देईल. तसेच ड्रायवरच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली जाईल. गाडी कुठल्या वेळेला कुठल्या ठिकाणी आहे याचे अपडेट ही ड्रायवरला मिळत राहतील.

या बॅंडचा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने विचार करायला हवा. आणि या बॅंडवर अधिक संशोधन होऊन ही सिस्टमचा वापर सर्वत्र व्हायला हवा. कारण आजकाल मद्यपान करून गाड्या चालवणार्‍यांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अशा नवीन आविष्कारचे स्वागत व्हायला हवे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *