FATBERG – a disaster of Uncleanliness

फॅटबर्ग – समस्या अस्वच्छतेची

मी सर्वप्रथम आमच्या कॉलेजचे प्रेसिडेंट श्री. शहा सर यांचे आभार मानते कि त्यांनी आम्हा शिक्षकांना आपले विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ दिले आहे. आमचे विचार या ब्लॉग मार्फत जगाच्या कानाकोपऱ्यापरयंत पोहचू शकतात.
अस्वच्छता म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर कचरा, नाले, गटारं हे सर्व उभे राहते. आता या अस्वच्छतेमध्ये भर घ्यालण्यासाठी एक राक्षस निर्माण झाला आहे. त्याच नाव आहे ‘ फॅटबर्ग'(fatberg).
फॅटबर्ग म्हणजे चरबी (फॅट), ग्रीस, लहान मुलांचे व वृध्दाचें फेकून दिलेले डायपर, सॅनिटरी नॅपकिन, कंडोम हे सारे एकवटून बनणारा एक घट्ट व अभेद्य ढिगारा जो काँक्रीट पेक्षाही मजबूत असतो.

सध्या लंडन, अमेरिका , ओस्ट्रेलिया , चीन, या देशांना फॅटबर्गची समस्या भेडसावत आहे. फॅटबर्ग हा काही नैसर्गिक नाही. आधुनिक जीवन शैलीचे हे उत्पादन आहे. फॅटबर्गचे घनफळ वेगाने आणि झपाट्याने वाढत आहे. लंडनच्या नाल्यामध्ये १० महाकाय आणि शेकडो छोटे फॅटबर्ग अडकून बसले आहेत. २०१३ साली लंडनमध्ये आढळलेला फॅटबर्ग हा २५ मीटर लांब व १५०० किलो वजनाचा होता. यंदाच्या फॅटबर्गची व्याप्ती २५० मीटर लांब असून त्याचे वजन १ लाख ३० हजार किलो एवढे आहे.
हे फॅटबर्ग विरघळण्यासाठी वविविध रसायने वापरली जात आहेत. मोठमोठी यंत्रे वापरून फॅटबर्ग फोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. फॅटबर्ग जर फुटला नाही तर नाले फुटून सर्व मळमिश्रीत पाणी सगळीकडे पसरून पुराची परिस्थिती येऊ शकते.
आज हि समस्या इतर देशांना भेडसावत आहे. पण येत्या काही वर्षात भारतालाही या समस्येचा सामना करावा लागेल. कारण फॅटबर्ग निर्मितीची सर्व कारणे भारतातसुध्दा आहेत. त्यामुळे ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीनुसार आपण वेळीच या गोष्टींना आळा घातला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *