पृथ्वीचे वाढते तापमान???

या सदरात आपण वेगाने वाढणाऱ्या तापमानाचा अभ्यास करू. पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत आहे.हे थांबवायचं असेल तर कार्बनचे उत्सर्जन कमी करावे लागणार आहे.हे त्वरित न थांबल्यास येत्या काही वर्षात पृथ्वीवर प्रचंड मोठी संकटे येतील.त्यांचा सामना करण्याची ताकद चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या विद्वान माणसाकडे ही नसेल औद्योगिकरणाचे वारे जोरात वाहत आहेत.वाहनांचा वापर अमर्याद होत आहे.यावर शक्य तेवढे नियंत्रण आणावयास हवे.विकास करावा की तापमान वाढीला, रोखायचे.अशा दुहेरी संकटात सारी राष्ट्र विशेषता: “विकसनशील राष्ट्रे अडकली आहे. त्यावर अतिशय काळजीपूर्वक व तातडीने उपाययोजना शोधायला हव्यात.” जनतेनेही सरकारी प्रयत्नांना साद देत आपल्या हातून कमीत कमी प्रदूषण होईल हे पहावयास हवे.नाहीतर सारेच देश एका छिद्र पडलेल्या जहाजाचे प्रवासी आहेत. हे छिद्र वेळीच बुजवले नाही तर ते जहाज बुडल्या शिवाय राहणार नाही. हे निश्चित या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी नक्कीच करायला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *