११-सु-संवादाचे दोन प्रमुख घटक-बोलणे आणि ऐकणे.

सध्या उच्च माध्यमिक गटाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करत आहोत. काही प्रश्न मी मागील सदरात मांडले. अजुनही काही प्रश्न शिक्षकवर्गाकडुन सोडवले जाऊ शकतात, त्याविषयी बोलु!
सध्या निरनिराळी प्रसार माध्यमे,समाज माध्यमे आणि भ्रमणध्वनी च्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचा मित्र-परिवार विस्तारला आहे. ही गोष्ट चांगली आहे परंतू त्या मैत्रीतून काही चांगल्या विचारांचे,चांगल्या माहिती चे आदान-प्रदान झाले तर ठीक आहे नाहीतर अशा मैत्रीतून काही वेळा काही वाईट सवयी जडतात, वाईट गोष्टी मुले करायला लागतात.
समवयस्क मुलामुलींमधले मैत्रीच्या पुढचे संबंध ही काही वेळा धोकादायक ठरतात त्याकारणावरून मुलांमधील परस्पर वैमनस्य वाढते,मारामाऱ्या, गुंडगिरी वाढीस लागते. याचा त्यांच्या पालकांना, शाळा अथवा काँलेजला मनस्ताप होऊन बसतो.
अशा वेळेला शिक्षकांनी या मुलांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. भाषा विषयाचे अध्यापन करताना निरनिराळी बोधप्रद उदाहरणे देऊन काय बरोबर ,काय चुक हे समजावून द्यावे.
भ्रमणध्वनी चा वापर माहिती मिळवण्यासाठी, विषयाचे सखोल ज्ञान येण्यासाठी, माहिती संकलनासाठी कसा करावा हेही सांगावे आणि त्या बाबत मार्गदर्शन ही करावे.
अशा विद्यार्थ्यांना काही वेळा वेगळे समुपदेशन ही करणे योग्य ठरते.त्यांचे वय, या वयामध्ये कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे, का द्यावे, ते देण्याने काय फायदे होऊ शकतात याबाबत प्रचलीत उदाहरणे देऊन समुपदेशन करावे. अन्यथा कोणते धोके पत्करावे लागतील याची समज द्यावी, जेणेकरुन ते आपल्या शैक्षणिक बाबींवर लक्ष देतील.
तसेच अनेक प्रकारचे छंद कसे जोपासता येतील,अभ्यासाव्यतिरिक्त काय करु शकता येईल, त्यांच्या मधे असलेल्या उर्जेचा, वेळेचा सदुपयोग कसा करून घेता येईल याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे म्हणजे त्याबाबत मार्गदर्शन करता येईल.
आत्ता इथेच थांबते. पुन्हा भेटुच!!
धन्यवाद!! http://mirziamov.ru

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *