११ वी प्रवेश online

११ वी प्रवेश online

उत्तम शिक्षण मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्कच आहे.
परंतु त्या करीता अतिशय किचकट अशा प्रक्रियेतून जाऊन ११वी साठी प्रवेश मिळविणे हे प्रत्येक १०वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी, त्याचे पालक, शाळा यांसाठी कठीण होऊन बसले आहे. या व्यतिरिक्त आपल्याला हव्या असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला किती फेऱ्या पार कराव्या लागतील याची काही गणतीच नाही.
या प्रक्रियेची अंमबजावणी जर सुसुत्रपणे केली तर विद्यार्थ्याला हवा तिथे प्रवेश, महाविद्यालयांना हवी तेवढी ( मान्यता असलेली पट संख्या ) विद्यार्थी संख्या मिळू शकेल आणि पालकांचाही मानसिक ताण कमी होईल.
दर वर्षी या प्रक्रियेतील गोंधळामुळे संबंधित आस्थापनांचे वेळ,पैसा,श्रम याचा अपव्यय किती होतो याची कल्पना फक्त तिथे काम करणारे मनुष्यबळ , संबंधित विद्यार्थी, पालक वर्ग यांनाच असते . परंतु हे टाळण्यासाठी संबंधित शाळा,तेथील शिक्षक , कर्मचारी वर्ग यांना योग्य रीतीने मार्गदर्शन शिक्षण खात्याकडून आगाऊ दिले गेले तर बराच अपव्यय टाळू शकेल . व दरवर्षी त्यामुळे होणारे तीन ते चार महिन्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान ही टळेल. त्या करीता शिक्षण खात्याने पूर्व नियोजन करून वेळीच त्या त्या संबंधित माध्यमिक शाळांना मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून मार्गदर्शन करावे हीच उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांची अपेक्षा आहे. जेणे करून ही प्रक्रिया सुकर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *