शिक्षण

शिक्षण

शिक्षणासाठी पदवी अन् पदवीसाठी शिक्षण.
राहत नाही एकसारखे,हे क्षणात बदलणारे शिक्षण.!

गरज मिटली,जीभ सुटली,अन् विसरलो स्वर,व्यंजन,
स्वप्ने मोठी तरीही दाखवी हे आजचे आधुनिक शिक्षण,

‘अभ्यास’ होता कधी काळी,आता केवळ मनोरंजन,
राहत नाही एकसारखे,हे क्षणात बदलणारे शिक्षण.!

अनुभव,समज,अन् माहितीचा जिथे असे समन्वय
तिथे  ‘शिक्षण’ शब्दाचा होतो खरा तो अन्वय
मनुष्य मी,अंश देवाचा,घाली जे डोळ्यांत अंजन,
‘घडवुनी’ जीवन ‘स्थिर’ करी जे, तेच खरे हो शिक्षण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *