शिक्षण: संस्कार आणि प्रयोग

चार कागदाचे तुकडे भरून “माझी मुलगी/ मुलगा शिकला पाहिजे” या वाक्यामागे एकच भाव असतो आणि तो म्हणजे त्याच्यात ‘ते’ भरलेले चार कागदाचे तुकडे परत मिळविण्याचे Education cum knowledge आलं पाहिजे म्हणजे मिळवलं.
शिक्षणाने माणसाचे जीवन बदलते असं म्हटलं जातं केवळ भौतिक नाही तर भावनिक आणि सामाजिक जीवन सुद्धा बदलत…, पण हे मांडणाऱ्या आणि अशी धारणा ठेवणाऱ्या या आपल्या समाजात माणसा ऐवजी शिक्षणच बदलताना दिसत आहे,शिक्षण हा माणसावर केलेला एक प्रयोग आहे पण आज माणूस मात्र या शिक्षणावरच प्रयोग करत आहे प्रत्येक दोन पाच वर्षांमध्ये त्याचे पॅटर्न बदलण्याचा प्रयत्न केला जातोय एकंदर काय तर माणूस आहे तिथेच आहे कारण त्याच वैयक्तिक जीवनाचा पॅटर्न काही बदललेला नाही पण शिक्षण देण्याचे मार्ग आणि पर्याय दोन्ही बदलले जात आहेत ही प्रगती म्हणावी की अधोगती कधी कधी कळतच नाही. शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहे मग ते सरकार असो वा समाजातील आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकार असोत सगळेच जण यासाठी प्रयत्न करत आहेत आणि यात काही चुकीचे नाही. पण कधी कधी वाटतं की आपण काही विसरत तर नाही ना कारण शिक्षण हा शब्द केवळ शाळा आणि महाविद्यालयाशींच जोडलेला आहे असं बऱ्याचदा वाटतं पण खर तर शिक्षण हा संस्कार आहे जो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत च्या दिवसभरातील वेगवेगळ्या प्रसंगातून आणि अनुभवातून आपल्यावर होत असतो मग ते घर असो, शाळा असो वा आणखी कुठलेही ठिकाण.अशा वेळी एक महान शिक्षण शास्त्री आणि activist Philosopher ने सांगितलेले वाक्य आठवतं ते म्हणजे जोपर्यंत कुटुंबव्यवस्था बदलणार नाही. तोपर्यंत शिक्षण व्यवस्था बदलणे शक्य नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *