औद्योगीकरण हीच एक समस्या ?????

मागील सदरात आपण पर्यावरण असंतुलनास आपण कसे जबाबदार आहोत. हे पाहिले याचे कारण आजच्या सदरात पाहून. विकसित देशांनी प्रगतीची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी औद्योगीकरण इतक्या झपाट्याने केले की कारखाने,वाहने यातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनात कडे दुर्लक्ष केले गेले.प्रचंड प्रदूषण करून धोक्याच्या,मृत्यूच्या उंबरठ्यावर आणून उभे केले. गरीब देश आपल्या प्रजेला दोन वेळचे देत जीवनमान उंचावण्याच्या स्थितीत असतानाच. ‘ग्लोबल वॉर्मिंगचे’ संकट उभे राहीले.वीज, वाहतूक, औद्योगीकरण यांचे बोट धरून गरीब देश प्रगती करू लागले. त्याच साधनांमुळे वातावरणात घातक वायू सोडले गेले. हे वायू सोडू नका असे श्रीमंत देश गरीब देशांना बजावू लागले आहेत. परंतु भारत व चीन सारख्या विकसनशील देशांच्या आर्थिक प्रगतीचा वेग जराही कमी झाला. तर विकासाकडे झेपावणारी ही राष्ट्र पूर्णपणे कोलमडून पडतील. त्यामुळे छोट्यांची ही अडचण ”आर्थिक दृष्ट्या दादा समजणार्या मोठ्यांनी समजून घ्यावयास हवी.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *