आपण खरंच विकसित आहोत का?

जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारत.

राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत जगाच्या तिसऱ्या क्रमांकाचा देश भारत.

भारताच्या या आर्थिक विकास व वृद्धी बद्दल वाचून, पाहून खरोखरच खूप अभिमान वाटतो. आज भारताला कुणीही taken for granted घेऊ शकत नाही अशी एक मोठी महासत्ता होऊ पाहणारा देश म्हणजे भारत.

सांस्कृतिक, धार्मिक, नैसर्गिक या सर्वच बाबतीत विविधतेने नटलेला संपूर्ण जगाला मार्गदर्शन करू शकेल असा वैचारिक वारसा असलेला आपला देश आता आर्थिक व सुरक्षिततेच्या बाबतीतही चीनला मागे टाकत पुढे जातोय.

  या आनंदाने मन भरून येते पण या आनंदित मनाने जेव्हा आपण सकाळचा न्युज पेपर वाचतो तेव्हा पाहतो की,‘अतिथी देवो भव‘ मानणाऱ्या भारतात परकीय प्रवाशांवर किती अमानवीय अत्याचार केला जातो , स्त्रियांवरील अन्याय, वाढते अत्याचार, वाढती गुन्हेगारी ,भ्रष्टाचार, समाजातील नैतिक मूल्यांचा ढसाळलेला पाया ही परिस्थिती पाहून मन खिन्न होते आणि विचार येतो की, खरोखरच आम्ही विकसित झालो आहोत का? केवळ देशाचा आर्थिक विकास म्हणजेच खरा विकास आहे का? नाही, तर जेव्हा आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होईल तेव्हाच देशाचा सर्वांगीण विकास झाला असे म्हणता येईल.

 आणि त्यासाठी आवश्यकता आहे कुटुंबव्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेत विशेषतः नवीन पिढीत नैतिक मूल्य आणि सांस्कृतिक मूल्ये रुजविण्याची. वयाची जबाबदारी कुटुंब संस्था आणि शिक्षण संस्था यांच्यावर आहे.

   कुटुंबांमधून आणि शाळा  महाविद्यालयांमधून मुलांवरती आदर्श नैतिक मूल्य रुजविण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न झाला पाहिजे. शैक्षणिक व आर्थिक बाबतीत माझा मुलगा सक्षम बनेल याचा ज्या तीव्रतेने विचार केला जातो त्याहीपेक्षा जास्त तीव्रतेने तो एक संस्कारी आणि आदर्श नागरिक बनेल असा आग्रह प्रत्येक पालकाचा व शिक्षकांचा असलाच पाहिजे भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा चरित्रांचा ग्रंथांचा(साहित्याचा)अभ्यास आणि विचार स्वतःबरोबरच आपल्या मुलांमध्ये रुजविला पाहिजे. तेव्हा आपण नक्कीच बोलू शकतो East or West India is the best

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *