अर्धपोटी गरिबांच्या हाती चार पैसे अधिक टेकवले तर ते काय करतील या प्रश्नाचे सर्वसाधारण उत्तर ‘पोटभर जेवतील’ असे असेल. पण प्रत्यक्षात तसे होत नाही रोजच्या पोटभर अन्नास मोताद असलेले हाती पैसे आल्यावर ते छानछोकी किंवा मनोरंजनावर खर्च का करतात? रस्त्यावर वर्षानुवर्षे वडापाव विकणाऱ्याची आयुष्यात बदल का होत नाही? किंवा सरपंचपदी महिला निवडली की गावच्या प्राधान्यक्रमात काय बदल होतो?
अशा वरवर साध्या वाटणाऱ्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन गरिबी निर्मूलनासाठी काय करावे लागेल याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न अभिजित बॅनर्जी आणि मायकल क्रेमर यांनी केला. याच अभ्यासासाठी या तिघांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. याबद्दल या तिघांचे अभिनंदन.
आपल्या गरीबीचा अभ्यासावर अनेक ज्ञान श्रीमंत झाले पण आपली गरिबी आहे तशीच. एखाद्या गरीब कुटुंबाच्या अवस्थेत वर्षानुवर्षे का बदल होत नाही आणि अशा कुटुंबियांचा समुच्चय असलेल्या देशांची परिस्थितीही बराच काळ
का तशीच राहते या आणि अशा अनेक प्रश्नांचे उत्तर हे नोबेल विजेते संशोधनात मिळते म्हणूनच त्यांच्या पारितोषिकाचे अधिक कौतुक.
कारण या तिघांनी हा अभ्यास प्रत्यक्ष गरिबांच्या सहवासात राहून केलेला आहे. त्यासाठी भारतातील अनेक प्रांत, आफ्रिकेतील काही देश या तिघांनी अक्षरशः पिंजून काढले. या परिसरात त्यांनी केवळ वरवरची भेट दिली नाही तर त्यांच्या सहवासात ते दीर्घकाळ राहिले. आपली निरीक्षणे नोंदवली. ती एकमेकांशी जोडून पाहीले आणि मग त्यांला सैद्धांतिक स्वरूप दिले. त्यामुळे हा त्यांचा प्रबंध हा केवळ प्रयोगशालेय राहत नाही त्यात वास्तवाचा आधार आहे. यात आवर्जून कौतुक करण्यासारखी बाब म्हणजे अशा अभ्यासासाठी परदेशी विद्यापीठात या अशा अभ्यासकांना मिळणारी उसंत इतका काळ संशोधन निरीक्षणासाठी व्यतीत करण्याची मुभा आपली विद्यापीठे देऊ शकत नाहीत. आणि दिली तरी त्याचा सदुपयोग करण्याची क्षमता आपल्या विद्यार्थ्यांतच आपण तयार केलेली नाही.
‘गरीब कोण’ हे ठरवून त्यांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित करणारे ‘आधार योजना’ सुरू करण्यासाठी सुरेश तेंडुलकर यांच्या व्याख्याचा आधार घेतला होता. गरिबांचे जगणे अत्यंत जवळून पाहिल्यावर बॅनर्जी यांनी जे निष्कर्ष काढले ते उपयुक्त ठरू शकतात. गरिबीच्या अभ्यासासाठी मिळालेल्या या नोबेलचे स्वागत आपण मुक्तपणाने करायला हवे.
धन्यवाद!<a href=”http://mirziamov.ru” target=”_blank”></a>